महिला व बालविकास विभागाचे आढावा बैठक जिल्हा परिषद नाशिक

 *प्रेस नोट*

*दि. १७/०३/२०२५*

प्रतिनिधी =निलेश शेकोकार

नाशिक- बालकांना पोषण आहार देऊन सुदृढ करण्यासोबतच त्यांच्यासाठी बौद्धिक विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे देखील तितकेच महत्त्वाचे असून पोषण आहारासोबतच सर्जनशील शिक्षण, खेळ आणि मानसिक विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी महिला व बालविकास विभागाचा आढावा बैठकीत दिले.

जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात येथे आज महिला व बालविकास विभागाच्या  विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीत सुपोषण अभियान, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, बालसंवर्धन कार्यक्रम,  लेक लाडकी योजना, पोषण अभियान, अंगणवाडी बांधकाम व पायाभूत सुविधा यांच्यासह विविध विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी अंगणवाडीमधील भौतिक सुविधा, वीज जोडणी, नळपाणी पुरवठा, शौचालय सुविधा वजन काटे उपलब्धता आयआयटी मुंबई स्तनपान विषयक प्रशिक्षण, ECCE पूर्व प्राथमिक शिक्षण,   शंभर दिवस अभियान आढावा व कार्यवाही, लोकसेवा हक्क कायदा या विषयांचा आढावा घेतला. तसेच अंगणवाडीचे काम केवळ पोषण आहार पुरविणे हेच नसुन शालेय वयापूर्वीच्या मुलांसाठी योग्य आहारासह त्यांच्या मेंदूच्या वाढीस चालना देणारे बौध्दीक उपक्रम राबवून बालकांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याची महत्वाची जबाबदारी अंगणवाडीची असल्याचे सांगितले. 

यावेळेस अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉक्टर बागुल यांनी बालमृत्यू,माता मृत्यू व लसीकरण याबाबत आढावा घेतला.

महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रतापराव पाटील यांनी देखील विविध विषयांबाबत मार्गदर्शन करताना सर्व योजनांचा नियमितपणे आढावा घेण्याच्या व क्षेत्रीय भेटी वाढवण्याच्या सुचना दिल्या. 

या बैठकीत  ग्रामपंचायत विभागाचे सहायक गटविकास अधिकारी प्रशांत पवार, सर्व प्रकल्पाचे बालविकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका व विस्तार अधिकारी सांख्यिकी व कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी  उपस्थित होते.

महिला व बालविकास विभागाचे आढावा बैठक जिल्हा परिषद नाशिक महिला व बालविकास विभागाचे आढावा बैठक जिल्हा परिषद नाशिक Reviewed by 87 NPS News Nashik on मार्च २०, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.