फोटोग्राफी* *क्षेत्रातील* *महिलांचा* *जागतिक* *महिला* *दिन* *नाशिक* *मध्ये* *मोठ्या* *उत्साहात* *संपन्न*..
*फोटोग्राफी* *क्षेत्रातील* *महिलांचा* *जागतिक* *महिला* *दिन* *नाशिक* *मध्ये* *मोठ्या* *उत्साहात* *संपन्न*..
जागतिक महिलादिनी फोटोग्राफी क्षेत्रातील महिलांसाठी इन्व्हेस्टमेंट व पुढील आयुष्यातील नियोजन यावर मार्गदर्शन सोबत
विविध मनोरंजनात्मक खेळासह मिसळ पार्टी..
*१३० महिलांचा लक्षणीय* *सहभाग*..
*नाशिक* - सालाबादाप्रमाणे याहीवर्षी " *नाशिक* *फोटोग्राफर्स* *असोसिएशन* " आयोजित जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला..
फोटोग्राफी क्षेत्रात कार्यरत महिलांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कॅमेरा पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली,कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी *मा* . *अल्पा* *शाह* मॅडमाचे विशेष ट्रॉफी व गोदाघाटाची फोटो फ्रेम देऊन स्वागत करण्यात आले.
खास महीला दिनानिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष पद सौ. गीतांजली संजय चौधरी व उपाध्यक्ष सौ. गौरी संतोष लाले यांना , देण्यात आले.
शहरातील पाटील वाडा येथे खास महिलांसाठी मुंबई येथील प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय वक्त्या माननीय अल्पा शहा यांचे पुढील भविष्यातील इन्व्हेस्टमेंट व रिटर्न यावर अतिशय सुंदर असं मार्गदर्शन त्याचबरोबर विविध मनोरंजनात्मक खेळ , धमाल मस्ती सह ,मिसळ पार्टीचे आयोजन करण्यात आले यामध्ये नाशिक जिल्ह्यातून महिलांनी लक्षणीय सहभाग नोंदवून कार्यक्रमाचा लाभ घेतला.
खास महिलांसाठी अशोक स्तंभ ते पाटील वाडा बसची व्यवस्था करण्यात आली होती या प्रवासात महिलांनी आपल्याकडील विचारांची देवाण-घेवाण करून खास गप्पा मारत मनमुराद आनंद लुटला अँकर मोहिनी लोहार यांनी आपल्या शैलीतून मनोरंजनात्मक खेळ घेतले .. यातून *३०* *बक्षीसे* काढण्यात आली , सदर महिलांना ट्रॉफी देऊन त्यांना गौरवण्यात आले.. त्याचबरोबर फोटोग्राफी क्षेत्रातील उल्लेखनीय काम व कार्य करणाऱ्या *३* *छायाचित्रकार* *महिलांना* *क्राऊन* व *ट्रॉफी* देऊन गौरवण्यात आले.. नाशिक मध्ये पहिल्यांदाच खास फोटोग्राफी क्षेत्रातील महिलांसाठी भविष्यातील इन्व्हेस्टमेंट या विषयावर मार्गदर्शन व "मिसळ पार्टी" व मनोरंजन खेळ व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
अध्यक्ष- संजय जगताप व सर्व कमिटी मेंबरने आज जे परिश्रम घेतले आहे ते खरंच वाखाण्याजोगे आहे.सर्वजण परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करतांना मी आज बघते आहे असेच उत्कृष्ट कार्य आपल्या हातून यापुढेही घडत राहो अशा शुभेच्छा माननीय अल्फा शहा यांनी संपूर्ण कमिटीला दिल्या , अध्यक्षीय भाषणात संजय जगताप यांनी उपस्थित सर्व महिलांचे स्वागत करून यापुढेही पुढील कार्यक्रमात सर्व महिलांनी सहभागी व्हावे तसेच व्हाट्सअप ला आपल्या व्यवसायातील महिलांचा एकत्रित ग्रुप करून सर्वांनी पुढील कार्यक्रमाला देखील सहकार्य करून आपला सहभाग नोंदवावा असे नमूद केले नंदू विसपुते यांनी सूत्रसंचालन केले तर सर्व कमिटी मेंबर यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय वक्त्या व लेखिका मा. अल्पा शाह (एंपाॅवर एज्युकेशन मुंबई)
श्री.व सौ. गौरी संतोष लाले, ( फोटो लाईट )
(नाईस डिजिटल फोटो लॅब व ट्राॅफी ) चे श्री. व सौ. गिताजंली संजय चौधरी, सौ. व श्री. स्नेहल संजय कदम (सिद्धिविनायक ट्रॅव्हल्स ) नाशिक यांचे विशेष सहकार्य लाभले..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: