जिल्हा परिषदेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा*


दि.०१.०५.२०२५


*जिल्हा परिषदेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा*


*शालेय विद्यार्थिनींचे नृत्य व गायन ठरले विशेष आकर्षण*


नाशिक – महाराष्ट्र राज्याचा ६६ वा स्थापना दिवस जिल्हा परिषदेत उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक श्रीमती आशिमा मित्तल यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहण करण्यात आले.


यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) रवींद्र परदेशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) वर्षा फडोळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मारुती मुळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे, कृषी विकास अधिकारी संजय शेवाळे, कार्यकारी अभियंता (इ.व.वि. १) संदीप सोनवणे, कार्यकारी अभियंता (इ.व.वि. २) पंकज मेतकर, जिल्हा समाजकल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर, तसेच ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गंगाधर निवडंगे यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सांस्कृतिक कार्यक्रम ठरले विशेष आकर्षण


महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील विद्यार्थिनींनी सादर केलेले नृत्य व गायन कार्यक्रम विशेष लक्षवेधी ठरले. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आशिमा मित्तल आणि इतर उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनींच्या सादरीकरणाचे कौतुक केले.


कार्यक्रमांची झलक :


1. समूह नृत्य – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, विल्होळी



2. समूह नृत्य – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मातोरी



3. वैयक्तिक नृत्य – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गोवर्धन



4. वैयक्तिक गीत गायन – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गोवर्धन

जिल्हा परिषदेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा* जिल्हा परिषदेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा* Reviewed by 87 NPS News Nashik on मे ०१, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.