दिनांक 03 /04 /2025 रोजी माननीय तहसीलदार मिलिंद कुलकर्णी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मोठी आढावा बैठक

 महाराष्ट्र राज्य शिव पांदन शेत रस्ता चळवळीचे प्रणेते शरदराव पवळे साहेब व राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य भर जे रस्त्या संदर्भात अभियान चालू आहे त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी साहेब नाशिक यांच्या परिपत्रकानुसार 569/2024 /18/12/2024 नुसार  आज दिनांक 03 /04 /2025 रोजी माननीय तहसीलदार मिलिंद कुलकर्णी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मोठी आढावा बैठक घेण्यात आली त्या बैठकीमध्ये माननीय उपअधीक्षक भूमी अभिलेख माननीय भाबड साहेब देवळा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक काळेसाहेब गट विकास अधिकारी कदम साहेब तसेच सर्व मंडळ अधिकारी सर्व महसूल अधिकारी सर्व पोलीस पाटील व सर्व ग्रामस्थरीय कमिटी तसेच महाराष्ट्र राज्य शिवपांदणशेत रस्ता चळवळ देवळा तालुका कृती समिती सदस्य व मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते एक महिन्यापूर्वी झालेल्या आढावा बैठकीत ज्या काही शेतकरी बांधवांनी रस्ता मिळण्यासाठी अर्ज दिले होते त्या अर्जांच्या संदर्भात चर्चा करून प्रत्येक ग्राम कमिटी मंडळ अधिकारी ग्रामसेवक यांना क** भाषेत सुनावण्यात आले प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन स्थळ निरीक्षण करून अहवाल देण्यात यावा या शेतकरी वर्गात समन्वयेने सहमतीने रस्ते खुले करण्यात यावेत ज्या ठिकाणी पोलीस बंदोबस्ताची गरज असेल त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त घेऊन रस्ता खुला करण्यात यावा व ज्या ठिकाणी शिव रस्ता मोजण्याची गरज असेल त्या  ठिकाणी भूमि अभिलेख देवळा यांची मदत घेण्यात यावी काही क्रिटिकल केसेस असतील तर त्यांच्या दावा दाखल करण्यात येऊन न्यायप्रविष्ठ पद्धतीने रस्ते खुले करण्यात येतील माननीय तहसीलदार मिलिंद कुलकर्णी साहेब यांनी शेतकरी बांधवांना सर्व शेतकरी बांधवांना रस्ते मिळतील त्याच्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल त्यासाठी शेतकरी बांधवांनी सहकार्य करावे असे सांगण्यात आले तसेच  महाराष्ट्र राज्य शिव पांदन शेत रस्ता चळवळ देवळा तालुका कृती समिती सदस्य व शेतकरी बांधव यांच्या वतीने मा तहसीलदार मिलिंद कुलकर्णी साहेब यांचे आभार मानण्यात आले

देवळा तालुका कृती समिती सदस्य भिका पवार, नानाजी शिंदे ,दिनकर सूर्यवंशी, अभिमन खैरनार, साहेबराव खोंडे ,त्र्यंबक पवार, संजय बर्वे, रवींद्र पवार व इतर बहुसंख्य शेतकरी बांधव हजर होते

दिनांक 03 /04 /2025 रोजी माननीय तहसीलदार मिलिंद कुलकर्णी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मोठी आढावा बैठक दिनांक 03 /04 /2025 रोजी माननीय तहसीलदार मिलिंद कुलकर्णी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मोठी आढावा बैठक Reviewed by 87 NPS News Nashik on एप्रिल ०३, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.