Press Note : नाशिक : जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थेत दि. 7 एप्रिल 2025 *"जागतिक आरोग्य दिन"* दिनी *"निरोगी सुरुवात, आशादायक भविष्य"* घोषवाक्याने जनजागृती कार्यक्रम राबवीणार.
87npsnewsnashik
दिनांक 7 एप्रिल 2025 रोजी "जागतिक आरोग्य दिन" जगभरातील सर्व देशात दर वर्षी साजरा करण्यात येत असतो. नाशिक जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य सुविधा अधिकाधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि निरोगी आयुष्यातून आशादायक भविष्य निर्माण करण्यासाठी, तसेच सर्वांचे क्षेमकुशल साध्य करण्यासाठी शासन अविरत कार्य करत आहे. जागतिक आरोग्य दिनाचे सन 2025 वर्षांसाठीचे घोषवाक्य *"निरोगी आयुष्यातून, आशादायक भविष्य"* असे आहे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी *आशीमा मित्तल,* जिल्हा आरोग्य अधिकारी *डॉ सुधाकर मोरे* यांचे मार्गदर्शनानुसार जागतिक आरोग्य दिनापासून विविध कार्यक्रम नाशिक जिल्हयाभरात वर्षभर साजरे करण्यात येणार आहेत.
नाशिक जिल्हयातील सर्व शासकीय आरोग्य संस्थेत दि. 7 एप्रिल 2025 रोजीच्या जागतिक आरोग्य दिनापासून वर्षभर आरोग्य जनजागृतीचे कार्यक्रमांचे नियोजन आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग मार्फत आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी, *डॉ. राजेंद्र बागूल* यांनी दिली आहे.
*"जागतिक आरोग्य दिन"* हा *"निरोगी सुरुवात, आशादायक भविष्य"* या घोषवाक्याने जनजागृती कार्यक्रम अंतर्गत माता व नवजात बालक मृत्यू दर कमी करणे, महिलांचे दीर्घकालीन आरोग्य आणि कल्याण यांना प्राधान्य देणे, प्रत्येक स्त्री व बाळाला जगण्यास आणि त्यांच्या भरभराटीस मदत करणे, महिलांना गरोदर अवस्थेत, बाळाच्या जन्मापूर्वी, दरम्यान आणि नंतर शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या सक्षमतेची आणि उच्च दर्जाच्या काळजीची आवश्यकता असते, त्यासाठी कुटुंबांना आधार व उच्च दर्जाची काळजी घेण्यासाठी प्रोत्साहित करणे, महिला आणि बाळांचे आरोग्य सुधारण्यासाठी कुटुंबांना प्रभावी गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित करणे, ई. कार्यक्रम माता व बाल आरोग्य कार्यक्रम अंतर्गत घेण्यात येणार आहेत.
या सोबतच महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजना, आरोग्य विमा योजना, पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, मंदिर/देवस्थान वैद्यकीय सहाय्यता निधी तसेच इतर सेवा भावी संस्थाच्या वैद्यकीय सहाय्यता निधीची माहिती, अर्ज करण्याची पद्धत, अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे, अर्ज कोणाकडे सादर करावयाचा, आदी बाबत सविस्तर माहिती गावा-गावात पोहचवून जनजागृती करणे, गर्भधारणा, बाळंतपण आणि प्रसूतीनंतरच्या कालावधीशी संबंधित उपयुक्त आरोग्य माहिती महिलांपर्यंत पोहचवण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र मार्फत आरोग्य सेवक, सेविका, आशा कार्यकर्ते यांच्यातर्फे विशेष गृह भेटी देऊन जनजागृती करणे, आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्थाचा विनामुल्य अधिकाधिक सहभाग वाढवून "निरोगी सुरुवात, आशादायक भविष्य" कार्यक्रमात जनजागृतीस प्रोत्साहित करणे.
तसेच सार्वजनिक आरोग्य विभागा अंतर्गत राबविण्यात येणारे राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम, कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम, ई-संजीवनी ओपीडी, आभा क्रमांक, अवयवदान कार्यक्रम, मासिक पाळी व्यवस्थापन, कावीळ प्रतिबंध, अनेमिया मुक्त भारत, प्रजनन आरोग्य जागरूकता, स्तन कर्करोग, स्तनपानाचे महत्व, साथीचे रोग, राष्ट्रीय नवजात बालक सप्ताह, मधुमेह, सुरक्षित मातृत्व, नियमित लसीकरण, आदी बाबीवर जनजागृती कार्यक्रमांचे नियोजन करणे. या सोबतच Smart PHC, District Quality Assurance, Kaya Kalp Assessment, LaQshya assessment, MusQan assessment, NQAS activities, Suman programme अंतर्गत आरोग्य संस्थाचे राज्यात चांगल्या प्रकारचे काम करणेसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी *डॉ. हर्षल नेहेते,* सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी *डॉ. दीपक लोणे, डॉ युवराज देवरे* , यांनी सर्व तालुक्यांचे तालुका आरोग्य अधिकारी च्या आढावा बैठकीत "जागतिक आरोग्य दिन" "निरोगी सुरुवात, आशादायक भविष्य" या घोषवाक्याने वर्षभर जनजागृती कार्यक्रम राबविणे बाबत सर्व आरोग्य कर्मचारी व अधिकारी यांना आवाहन केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: