मासिक पाळी कप जनजागृती व वितरण अभियान" _ नाशिक जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण पाऊल

 "मासिक पाळी कप जनजागृती व वितरण अभियान" _ नाशिक जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण पाऊल.


नाशिक : ग्रामीण भागातील किशोर वयीन मुली आणि महिला मध्ये मासिक पाळी कप बाबत जनजागृती व्हावी व त्याचा वापर वाढावा, या प्रमुख उद्देशाने मासिक पाळी कप च्या वितरण कार्यक्रमाचे उद्घाटन मा. ना. आदिती तटकरे यांच्या हस्ते, महिला व बाल विकास विभाग, मा. आ. छगन भुजबळ, मा. आ. देवयानी फरांदे, मा.आ. सरोज अहिरे, मा. आ. हिरामण खोसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कालिदास कलामंदिर, नाशिक येथे संपन्न झाला. 

 आरोग्य विभागात कार्यरत असणाऱ्या आशा कार्यकर्ती या ग्रामीण भागातील सर्वसामान्य महिलांच्या थेट संपर्कात असल्या कारणाने, आशा कार्यकर्तीची निवड या कार्यक्रमासाठी करून आशा कार्यकर्ती ना प्रशिक्षण देऊन मासिक पाळी कप वापरासाठी ग्रामीण भागातील किशोर वयीन मुली आणि महिलाना प्रोत्साहन देणार आहोत. नाशिक स्री रोग तज्ञ संघटना अध्यक्ष डॉ. नेहा लाड आणि डॉ. गौरी करंदीकर व HLL Lifecare च्या डॉ. राजश्री दिवेकर, प्रो. डॉ. कानन, प्रो. डॉ. बेला आय.आय.टी. मुंबई यांनी मासिक पाळी व्यवस्थापन प्रशिक्षण घेतले. यासाठी तालुका निहाय व प्रा. आ. केंद्र निहाय प्रशिक्षण सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत. प्रशिक्षण सत्रा नंतर प्रत्येक आशा कार्यकर्तीला मासिक पाळी कप वितरित करण्यात येणार आहे. अशा प्रकारे एकूण ३,००० मासिक पाळी कप चे वितरण ही जिल्हास्तरावरून सेस मार्फत खरेदी करून देण्यात आले आहेत. 

कप वितरित झाल्यानंतर आशा कार्यकर्ती ना मार्गदर्शन करण्यासाठी दूरध्वनी प्रणाली द्वारे संपर्क व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. या सर्व लाभार्थीचे वेळोवेळी अभिप्राय देखील नोंदविण्यात येणार आहेत. याच आशा कार्यकर्ती ग्रामीण भागातील, आपल्या कार्यक्षेत्रातील किशोरवयीन मुली आणि महिलाना मासिक पाळी कप वापरा संदर्भात प्रशिक्षण व जनजागृती करण्याची भूमिका पार पाडतील.

सोबतच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य पाठ-पुरावा online संगणकीय प्रणाली (RBSTS) चे लोकार्पण देखील करण्यात आले, त्यात अंगणवाडीतील बालकांची वेळेत तपासणी करून संदर्भ सेवेतील विलंब कमी करणे, संदर्भित बालकांची माहिती विविध संबंधित विभाग याना त्वरित उपलब्ध करून सुसूत्रता आणने व कार्यक्षमता वाढवणे या प्रमुख उद्देशाने बालकांची नोंदणी: विशिष्ठ अद्वितीय आयडी सह तपासणीचे वेळापत्रक तयार करण्यात येणार आले आहे. ज्यात बालक तपासणी नोंदी, उंची, वजन आणि इतर आरोग्य निर्देशांक तसेच व्यंग/ आजार निदान 4 D’s त्वरित निदान, जन्मजात व्यंग (Defects at birth), आजार (Diseases), कमतरतेचे आजार (Deficiencies), शारीरिक विकास मधील बाधा (Development delays) करण्यासाठी मदत होणार आहे. ज्यामुळे बालकांची आरोग्य स्थिती व उपचार प्रगतीचा पाठपुरावा करणे आरोग्य कर्मचारी यांना शक्य  होऊन लाभार्थी कुटुंबाचा प्रवास आणि प्रतीक्षा कालावधी कमी होणार आहे.

नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य विभागात कार्यरत असणाऱ्या आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तक यांचा जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम पार करण्यात आला.

मासिक पाळी कप जनजागृती व वितरण अभियान" _ नाशिक जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण पाऊल मासिक पाळी कप जनजागृती व वितरण अभियान" _ नाशिक जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण पाऊल Reviewed by 87 NPS News Nashik on मे ०८, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.