*समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाने 28 मे 2025 रोजी सावरकर जयंती उत्साह साजरी

 *समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ                 समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाने 28 मे 2025 रोजी सावरकर जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित केला त्यास नागरिकांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सावरकराच्या जीवनपटाचे अभिवाचन त्यातील गीतांसहित आयोजित केले होते . कोरडे ताई, वाघताई, कुलकर्णी ताई व अमृतकरताई यांनी कार्यक्रम सादर केला. अतिशय ओघवत्या शैलीत त्यांनी इतकं उत्कृष्ट सादरीकरण केले की अक्षर शहा मूर्तीमंत तात्यासाहेब आपल्यापुढे उभे केले. त्यातील जोशपुर्ण गीताने तर संपूर्ण संभागृह डोलायलालावले वातावरनात राष्ट्रभक्तीचा जागर निर्माण करून कार्यक्रम अतुच्य पातळीवर नेला.यानंतर नासिकमधील प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉक्टर निलेश जेजुरकर यांनी 'मानसिक आरोग्य आणि ताणतणाव नियोजन 'या ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने महत्वाच्या जिव्हाळाच्या विषयावर मार्गदर्शन केले. अत्यंत सोप्या भाषेत त्यांनी सवांद साधतं वातावरनात मोकळे पणा आणुन एक एक पदर उलगडून श्रोत्यांना आपलेसे केले. आहार विहार विचार या त्री सूत्रीचे विश्लेषण त्यांनी अतिशय शास्रशुद्ध पद्धतीने पटवून दिले. मनावरचा ताण नाहीसा करण्यास हास्य किती महत्वपुर्ण हेही विषद करून सांगितलं.यावेळी मे महिन्यात वाढदिवस असणाऱ्या सभासद बंधु भगिनींचा सन्मान करन्यात आला.कोरडेताई,वाघताई, कुलकर्णी ताई, अमृतकर ताई व डॉ निलेश जेजुरकर यांचा सत्कार करण्यात आला. भारतीय सैन्य दलातील रजेवर आलेले सुहास कोकणे यांना विशेष सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यवाह किरण दीक्षित यांनी केले डी डी पाटील यांनी प्रसंगानुरूप गीत सादर केले डॉक्टरांचा परिचय नाना बच्छाव यांनी करून दिला. प्रास्ताविक अध्यक्ष बाळासाहेब केंगे यांनी केले आभारप्रदर्शन कोशाध्यक्ष अजित अध्यापक यांनी केले दादा कोठावदे यांच्या सुरेल आवाजातील पसायदानाणे सांगता झाली. कार्यक्रमास अण्णा देशपांडे, गायमुखे साहेब, सवडकर साहेब, क्षीरसागर गुरुजी,नाना बच्छाव, शिवाजीराव काकड, रवींद्र पाटील, एकनाथ कोपे,प्रेमचंद चौधरी, प्रभाकर जगताप,आकांशा देशपांडे, सुनंदा बोदवडकर, होनप ताई, मनीषा चव्हाण यासह  परिसरातील नागरिक प्रचंड संख्येने उपस्थित होते बाळासाहेब केंगे, अध्यक्ष              समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ.*

*समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाने 28 मे 2025 रोजी सावरकर जयंती उत्साह साजरी *समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ                 समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाने 28 मे 2025 रोजी सावरकर जयंती  उत्साह साजरी Reviewed by 87 NPS News Nashik on मे २८, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.