चांदोरी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये युवा परिवर्तन क्रांतीदिप सामाजिक संघटनेच्या वतीने ग्राहक हक्क दिनानिमित्त शालेय साहित्याचे वाटप

चांदोरी, (ता. निफाड) | ग्राहक हक्क दिनाच्या निमित्ताने युवा परिवर्तन क्रांतीदिप सामाजिक संघटनेच्या वतीने चांदोरी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. पत्रकार आणि समाजसेवक मंगेश भन्साळी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.



यावेळी विद्यालयाचे प्राचार्य चौधरी सर, तसेच व्ही. एन. टर्ले सर, गावित सर, शरद गडाख सर, आकाश टर्ले सर, मोरे सर, गोसावी सर, ठोके सर, बगाव सर, गेटम मॅडम, सोमवंशी मॅडम, गोरडे मॅडम, गावित मॅडम, टर्ले मॅडम, बिरारी मॅडम, अहिरे बी. व्ही. मॅडम, गोसावी मॅडम, गायकवाड मॅडम, अहिरे एम. ओ. मॅडम, सानप मॅडम, भामरे मॅडम, रिपोटे मॅडम, लोखंडे मॅडम आणि अन्य शिक्षक उपस्थित होते.


यावेळी युवा परिवर्तन क्रांतीदिप संघटनेचे अध्यक्ष राहुल उन्हवणे आणि विलास गडाख यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या महत्त्वावर भाष्य केले. ग्राहक हक्क दिनानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.


शालेय साहित्य मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. संस्थेच्या या सामाजिक कार्याचे उपस्थित शिक्षक आणि पालकांनी कौतुक केले.


युवा परिवर्तन क्रांतीदिप सामाजिक संघटनेच्या माध्यमातून असेच उपक्रम राबवले जात राहतील, असे आयोजकांनी सांगितले.

चांदोरी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये युवा परिवर्तन क्रांतीदिप सामाजिक संघटनेच्या वतीने ग्राहक हक्क दिनानिमित्त शालेय साहित्याचे वाटप चांदोरी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये युवा परिवर्तन क्रांतीदिप सामाजिक संघटनेच्या वतीने ग्राहक हक्क दिनानिमित्त शालेय साहित्याचे वाटप Reviewed by 87 NPS News Nashik on मार्च १५, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.