*नाशिक मध्ये खुनाचे सत्र सुरूच..* *दोन सख्या भावाचा खुन, उमेश उर्फ मन्ना जाधव आणि त्यांच्या भावाचा खून.*

 *नाशिक मध्ये खुनाचे सत्र सुरूच..*

*दोन सख्या भावाचा खुन, उमेश उर्फ मन्ना जाधव आणि त्यांच्या भावाचा खून.*

*87NPSNewsnashik प्रतिनिधी निलेश शेकोकार*

   नाशिक : शहरात खळबळजनक आणि धक्कादायक घटना घडली आहे. राष्ट्रवादी अजितदादा गटाचे शहर उपाध्यक्ष उमेश उर्फ मन्ना जाधव आणि त्यांचे सख्खे भाऊ प्रशांत जाधव यांचा धारदार शस्त्राने   निर्घृण खून करण्यात आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. 

    ही घटना उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील बोधलेनगरजवळील आंबेडकरवाडीच्या सार्वजनिक शौचालयासमोर घडली. अचानक करण्यात आलेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

     नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून खून, हाणामाऱ्या आणि गंभीर गुन्ह्यांच्या घटना वाढत चालल्या आहेत. यामुळे नाशिक शहरातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे, असेच चित्र दिसत आहे. खून आणि गुन्‍हेगारीचे प्रकार नित्याचे झाले आहेत, अशी नागरिकांतून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, आरोपींच्या शोधासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले आहे.या दुहेरी हत्येमुळे संपूर्ण शहरात मोठा तणाव निर्माण झाला असून, पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

*नाशिक मध्ये खुनाचे सत्र सुरूच..* *दोन सख्या भावाचा खुन, उमेश उर्फ मन्ना जाधव आणि त्यांच्या भावाचा खून.* *नाशिक मध्ये खुनाचे सत्र सुरूच..* *दोन सख्या भावाचा खुन, उमेश उर्फ मन्ना जाधव आणि त्यांच्या भावाचा खून.* Reviewed by 87 NPS News Nashik on मार्च २०, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.