समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाणे गुरवार दि.10 *दासबोध, मनाचे श्लोक, शंकराचार्य व उपनिशिद मा. श्री दिवाकर यावलकर 'मनाचे श्लोक (मनोबोध ) प्रवचन चेतना नगर नाशिक

 *समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ  

87npsnewsnashik=*7038993293*

 *प्रतिनिधी निलेश शेकोकर नाशिक*

               समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाणे गुरवार दि.10 एप्रिल 2025 रोजी संध्याकाळी 5.30 वाजता*  *दासबोध, मनाचे श्लोक, शंकराचार्य व उपनिशिद याचा गाढा अभ्यास असणारे मा. श्री दिवाकर यावलकर  'मनाचे श्लोक (मनोबोध )या अतिशय सुंदर पारमार्थिक विषयावर निरूपण आयोजित केले होते त्यास सभासद बंधु भगिनींचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. श्री यावलकर यांनी दिड तासांच्या आपल्या निरूपणत मनाच्या श्लोकांचे महत्व त्याची रचना त्याचा उद्देश हें सविस्तर मांडून पहिल्या तीन श्लोकाणचा विस्ताराने उहापोह करून अतिशय सोप्या भाषेत आपल्या रसाळ वाणीने श्रोत्यांना मंत्र मुग्ध केले श्रोते अतिशय भारावून त्यांचे विचार श्रवण करीत होते. सर्व प्रथम दिप प्रज्वलन करून कार्यक्रमांची सुरवात झाली. अध्यक्ष बाळासाहेब केंगे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. त्यानंतर प्रमुख पाहुणे दिवाकर यावलकर यांचा व दासबोध पारायनाचे व्यासपीठ चालक श्री अशोकराव देशपांडे व सौ अलका देशपांडे यांचा तसेच यावेळी एप्रिल महिन्यात वाढदिवस असणाऱ्या सभासदांचा सन्मान केला गेला. श्री गिरनार दादा यांनी लागोपाठ तीन वर्षे पायी नर्मदा परिक्रमा केल्याबद्दल श्री देवानंद बिरारी यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. याठिकाणी श्री अशोकराव देशपांडे यांनी सुवाच्च अक्षरात स्वहस्ताने लिहिलेले ग्रंथ (दासबोध, ज्ञानेश्वरी, भगवत  गीता इ.) नागरिकांना बघण्यासाठी ठेवले होते त्यास उत्स्फूर्त दाद मिळाली. आभार प्रदर्शन उपाध्यक्षा श्रीमती मनीषाताई कुलकर्णी यांनी केले संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यवाह श्री किरण दीक्षित यांनी केले. पसायदानाणे सांगता झाली.कार्यक्रमास श्री देवानंद बिरारी, सौ वंदना बिरारी, अप्पा कुलकर्णी, शशिकांत पंडीत, अण्णा देशपांडे, दादा कोठावदे, वैद्य काका, नाना बच्छाव, अविनाश देशपांडे, अजित अध्यापक, निकम सर, शिवाजीराव काकड, एकनाथ कोपे, तुकाराम नागरे रविंद्र पाटील, प्रेमचंद चौधरी, कातकाडे सर,सुनील जोशी,रमेश चंद्रात्रे,चंद्रशेखर बेलगावकर, शिंदे बाबा,महेश कानोजिया, श्रीमती सविता किल्लेदार, सुनंदा बोदवडकर, सुरेखा पाराशरे, सीमांतीनी कुलकर्णी, मनीषा चव्हाण, सौ बोरसे, सौ खैरनार यासह स्त्री पुरुष प्रचंड संख्येने उपस्तिथ होते बाळासाहेब केंगे, अध्यक्ष                 समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ*

समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाणे गुरवार दि.10 *दासबोध, मनाचे श्लोक, शंकराचार्य व उपनिशिद मा. श्री दिवाकर यावलकर 'मनाचे श्लोक (मनोबोध ) प्रवचन चेतना नगर नाशिक समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ                 समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाणे गुरवार दि.10   *दासबोध, मनाचे श्लोक, शंकराचार्य व उपनिशिद  मा. श्री दिवाकर यावलकर  'मनाचे श्लोक (मनोबोध ) प्रवचन चेतना नगर नाशिक Reviewed by 87 NPS News Nashik on एप्रिल १०, २०२५ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.